फुटपाथवर भाजीविक्रेत्यांचा कब्जा; ग्राहकांची वाहनेही रस्त्यावर

राजेंद्र ननावरे
Friday, 9 October 2020

मलकापूर फाटा ते अक्षता मंगल कार्यालयापर्यंत व्यावसायिकांनी व फळविक्रेत्यांनी सेवा रस्त्यालगत गाडे उभे केले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. कोयना वसाहत रस्ता रुंदीला कमी असून या रस्त्यावर सतत रहदारी असते. त्या परिसरात रस्त्यावरच भाजीविक्रेते बसतात. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ग्राहक वाहने लावतात. त्यामुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडी होते.

मलकापूर (जि. सातारा) : आगाशिवनगरला कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर रस्त्याकडेला फुटपाथवर भाजीविक्रेते बसतात. मलकापूर फाटा ते अक्षता मंगल कार्यालय परिसरात फळविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. ग्राहकांची वाहने निम्म्या रस्त्यावरच लागलेली असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी या रस्त्यावरून वाट काढताना पादचारी, वाहनधारक मेटाकुटीला येत असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या विक्रेत्यांना पालिकेने शिस्त लावण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

आगाशिवनगरला ढेबेवाडी मार्गावर रस्त्याकडेला फुटपाथवर व कोयना वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच भाजीविक्रेते बसतात. ग्राहकांची वाहने रस्त्यावरच लागलेली असतात. वाहनांतून व्यवसाय करणाऱ्या काही विक्रेत्यांच्या वाहनांसह सगळा बाजारच राज्यमार्गावर मांडलेला असतो. त्यामुळे ढेबेवाडी फाटा ते झेडपी कॉलनी परिसरात झालेल्या गर्दीमुळे अनेक छोटे अपघातही घडले आहेत. 

अपयश लपवण्यासाठीच जनशक्तीचा आरोप; रोहिणी शिंदेंचा यादवांवर पलटवार 

मलकापूर फाटा ते अक्षता मंगल कार्यालयापर्यंत व्यावसायिकांनी व फळविक्रेत्यांनी सेवा रस्त्यालगत गाडे उभे केले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. कोयना वसाहत रस्ता रुंदीला कमी असून या रस्त्यावर सतत रहदारी असते. त्या परिसरात रस्त्यावरच भाजीविक्रेते बसतात. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ग्राहक वाहने लावतात. त्यामुळे या परिसरात सतत वाहतूक कोंडी होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Of Vegetable Sellers On Sidewalk At Malkapur Satara News