
leopard Death
sakal
कोळे : येणके ते किरपे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार झाला. गुरुवारी पहाटे घडलेल्या घटनेनंतर मादीने मृत बछड्याला काही अंतर ओढत निर्जनस्थळी नेले. माहिती मिळताच कऱ्हाड वन विभाग व वाइल्ड हार्ड रेस्क्यूअर्स नाइट्स, कऱ्हाड टीमने मृत बछड्याला शोधण्यात यश मिळवले. त्यांच्यावर कोळे येथे अंत्यसंस्कार केले.