esakal | उमेदवार निवडी सर्वपक्षीयांचा विचार करुनच; NCP नेत्यांचा सूर
sakal

बोलून बातमी शोधा

उमेदवार निवडी सर्वपक्षीयांचा विचार करुनच; NCP नेत्यांचा सूर

उमेदवार निवडी सर्वपक्षीयांचा विचार करुनच; NCP नेत्यांचा सूर

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असणार्‍या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वपक्षीयांचा समावेश करुन लढवण्यासाठी विचार सुरु आहे. उमेदवार निवडीबाबतचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी यांचेशी विचार विनिमय करून घेतला जाणार असल्याची सुर किवळ (ता. कऱ्हाड) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत उमटला.

किवळ येथे माजी उपायुक्‍त तानाजीराव साळुंखे यांच्या निवासस्थानी सुमारे दोन तास झालेल्या गोपनीय बैठकीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, बँकेचे संचालक नितीन पाटील उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार मकरंद पाटील काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांना सात तारखेला वेतन; औद्योगिक न्यायालयाचे आदेश

श्री. नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासन उत्तम असून, बँकेचा नावलौकीक संपूर्ण भारतात आहे. बँकेस उच्चतम कार्यक्षता व आर्थिक व्यवस्थापणाचे नाबार्डचे पुरस्कार मिळाले आहेत. बँकेच्या सुलभ कर्ज ध्येय धोरणामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकर्‍यांची आर्थिक सबलता वाढल्याचे सांगितले.

सहकारमंत्री पाटील यांनी जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम चांगले सुरु आहे. निवडणुकासाठी कौशल्य वापरून सर्व पक्षांतील सदस्यांना व हितचिंतकांना बरोबर घेऊन बँकेची निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्याकडे दिली आहे. मी सर्व पक्षातील हितचिंतकांचा विचार घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. यापुढील ध्येयधोरणे बँकेच्या हिताची ठरतील असे सर्वानुमते निर्णय घेणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे सहकाराचे खरेखुरे उद्धिष्ट, सहकारातून कृषी औद्योगिक क्रांती आणि बँकेचे ग्राहक व सभासद शेतकरी आर्थिक सबल होणार आहेत, असे सांगीतले.

हेही वाचा: निसरे फाट्यावरील अवैध धंद्यांवर कारवाई करा

दरम्यान, बैठकीत उमेदवार निवडीबाबतचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी यांचेशी विचार विनिमय करून घेतला जाणार असल्याचा सुर उमटला. किवळचे माजी सरपंच सुनील साळुंखे यांनी आभार मानले.

राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार, सह्याद्रिचे संचालक संजय थोरात, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, डॉ.विजय साळुंखे, मानसिंग मोहिते, निवासराव पाटील, महेंद्र मांडवे आदी उपस्थित होते.

loading image
go to top