राष्ट्रवादीच्या "एकला चलो रे' च्या भूमिकेने वाईतील कॉंग्रेस आक्रमक

भद्रेश भाटे
Tuesday, 29 December 2020

त्यांना तालुक्‍यातील मुख्य पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना मार्गदर्शनासाठी कॉंग्रेसचा मदत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाई (जि. सातारा) : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडी धर्म पाळताना दिसत नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख दोन दिवसांवर आलेली असताना राष्ट्रवादीने अद्यापही आपल्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. आघाडी धर्म न पाळता "एकला चलो रे'च्या भूमिकेत राष्ट्रवादी असेल तर सर्वच ग्रामपंचायतींत कॉंग्रेस पक्ष आपले उमेदवार उभे करून पूर्ण ताकदीनिशी लढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी दिला.
 
तालुका कॉंग्रेसच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे निवडणूक समन्वयक राम राजे (सांगली), प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव जयदीप शिंदे, सेवा दलाचे अध्यक्ष ऍड. प्रताप देशमुख, तालुका युवक अध्यक्ष प्रमोद अनपट, ज्येष्ठ नेते वामनराव जमदाडे, प्रदीप जायगुडे, विलासराव पिसाळ, मदन ननावरे, अतुल संकपाळ, विशाल डेरे, रवींद्र भिलारे, गणेश हरचुंदे, विकास जाधव उपस्थित होते.

उदयनराजेंचे मित्रप्रेम; बाळासाहेबांच्या पाठीशी राहिले ठाम

इचलकरंजीतील क्रीडा संकुलाच्या मंजुरीला गती

अनेक कार्यकर्त्यांनी मेळाव्यात आपली भूमिका मांडताना कॉंग्रेसने उमेदवार उभे करण्याचा आग्रह धरला. राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार नसेल, तर पक्षाची फरपट करून न घेण्याची भूमिका मांडली. प्रत्येक गावात समविचारी पक्षाशी युती करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या ग्रामपंचायतीत कॉंग्रेसची ताकद चांगली आहे, त्या ठिकाणी संपूर्ण पॅनेल उभे करण्याची तयारी करावी. त्यांना तालुक्‍यातील मुख्य पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना मार्गदर्शनासाठी कॉंग्रेसचा मदत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रदीप जायगुडे, वामनराव जमदाडे, विलास पिसाळ, मदन ननावरे, जयदीप शिंदे, विकास जाधव, प्रमोद अनपट, गणेश हरचुंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक समन्वयक राम राजे यांनी मार्गदर्शन केले. रवी भिलारे यांनी आभार मानले.

बॅंक खाते उघडण्याचा प्रश्न मिटला; इच्छुकांना निवडणूक आयोगाचा दिलासा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates Of Congress Will Contest Grampanchayat Election Satara News