कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सातारा, कऱ्हाड, खटाव, कडेगाव, कोरेगाव या तालुक्यातील २३४ गावांत कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. निवडणुकीसाठी ३२ हजार २०५ मतदार पात्र असून, पाच एप्रिलला मतदान होणार आहे. यावेळी दोन्ही पॅनेलमध्ये समोरासमोर लढत होईल, असे चित्र असताना अर्ज माघारीदिवशी विरोधकांत फूट पडून तिसरे पॅनेल तयार झाले. यावेळी तीन पॅनेलमध्ये लढत होत असून, मतदानासाठी अवघे दोनच दिवस राहिल्याने मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे.