esakal | जुनी केस मागे घेण्‍यावरुन दांडक्‍याने मारहाण; सातार्‍यात चौघांवर गुन्‍हा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

चारचाकीत असणार्‍या चौघांनी पवार यांना मारहाण करत दुचाकीवरुन खाली पाडले आणि पत्‍नीने सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात नोंदवलेली तक्रार मागे घेण्‍याविषयी धमकावले.

जुनी केस मागे घेण्‍यावरुन दांडक्‍याने मारहाण

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : येथील रविवार पेठेत असणार्‍या पोलीस लाईन परिसरात अडवून जुनी केस मागे घेण्‍याच्‍या कारणावरुन मारहाण करत दुचाकी लांबवल्‍याप्रकरणी करंजे येथील चौघावंर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात (Satara City Police Station) गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. मंगळवार पेठेत संतोष राजाराम पवार हे राहण्‍यास आहेत. ते काल रविवार पेठेतील पोलीस लाईन रस्‍त्‍यावरुन कुटुंबियांसमवेत दुचाकीवरुन निघाले होते. (Case Filed Against Four Persons From Satara In Two-wheeler Theft Case Satara Crime News)

यावेळी त्‍यांची दुचाकी चारचाकीतून आलेल्‍या अमित शिवाजी बाबर, शिवाजी लक्ष्‍मण बाबर (रा. बाबर कॉलनी, करंजे), वंदना रजपुर व अनोळखी एकाने (रा. बसाप्‍पा पेठ, करंजे) यांनी अडवली. चारचाकीत असणार्‍या चौघांनी पवार यांना मारहाण करत दुचाकीवरुन खाली पाडले आणि पत्‍नीने सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात नोंदवलेली तक्रार मागे घेण्‍याविषयी धमकावले. धमकावत असतानाच त्‍यांनी पवार यांना, तसेच त्‍यांच्‍यासोबत असणाऱ्या पत्‍नीस लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.

हेही वाचा: जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई; शेतकऱ्यांसह कर्मचारी आक्रमक

मारहाण करतानाच त्‍यांनी कुटुंबीयांना जिवे मारण्‍याची धमकी देत जबरदस्‍तीने दुचाकी हिसकावली. दुचाकी हिसकावल्‍यांनतर त्‍यांना पुन्‍हा एकदा धमकी देत अमित बाबर हे पवार यांच्‍या दुचाकीसह त्‍याठिकाणाहून निघून गेले. या मारहाणीत पवार आणि त्‍यांच्‍या पत्‍नीस दुखापत झाली आहे. याची तक्रार काल रात्री पवार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली. यानुसार अमित बाबर, शिवाजी बाबर, वंदना रजपुत यांच्‍यासह एका अनोळखीवर जबरी चोरीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक ए. यू. मुजावर हे करीत आहेत.

Case Filed Against Four Persons From Satara In Two-wheeler Theft Case Satara Crime News

loading image