उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा हॉस्‍पिटलमध्ये नवीन प्लांट सुरू; तिसऱ्या लाटेसाठी सज्जता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

case of oxygen Karad is self sufficient

कऱ्हाड : ऑक्‍सिजनबाबतीत कऱ्हाड स्वयंपूर्ण

कऱ्हाड : कोविडचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने बेडसह अन्य यंत्रणेची सज्जता ठेवली आहे. कोविडचे रुग्ण वाढल्यावर त्यांचे ऑक्‍सिजन कमी येते. मध्यंतरी ऑक्‍सिजन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावे लागले. त्याचा विचार करून प्रशासनाने येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्‍वित केला आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या वाढत्या ऑक्‍सिजनची गरज ओळखून येथील कृष्णा हॉस्‍पिटलनेही ऑक्‍सिजन प्लांट सुरू केला आहे. त्यामुळे कऱ्हाडला मुबलक ऑक्‍सिजन उपलब्ध होणार असल्याने सध्या तरी कऱ्हाड ऑक्‍सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्णच झाले आहे.

हेही वाचा: Latur Rain : लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट; ज्वारी,गव्हाचे नुकसान

मध्यंतरी कऱ्हाड तालुक्यातील कोविडबाधितांची संख्या अगदी एक-दोन आकड्यांत आली होती. मात्र, दोन आठवड्यांपासून वातावरणात बदल झाल्याने अनेक लोकांना सर्दी, ताप, खोकल्याची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या दवाखान्यांतही रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर या आजारामुळे कोविडबाधितांचेही प्रमाण झपाट्याने वाढू लागले असून, ते आता शेकड्यात गेले आहे. रुग्ण वाढीचा हा दर दुप्पट आहे. ही संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविडबाधित वाढू लागल्यावर त्यातील अनेकांना धाप लागते. त्यावेळी त्यांना ऑक्‍सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्यासाठी त्यांना कृत्रिम ऑक्‍सिजन द्यावा लागतो. मागील दोन लाटांमध्ये अनेकांना वेळेत ऑक्‍सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा: खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या मुलासह वडिलांचा खून

त्याचबरोबर त्यावेळी ऑक्‍सिजनचा तुटवडाही राज्यात निर्माण झाला होता. त्यामुळेही रुग्णांचे मोठे हाल झाले. त्याचा विचार करून प्रशासनाने रुग्णांना वेळेत ऑक्‍सिजन मिळावा आणि तो अखंडित मिळावा यासाठी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्‍वित करण्यात आला आहे. त्यासाठीची कार्यवाही पूर्ण झाली असून, त्याची चाचणी घेऊन तो प्लांट सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाढत्या ऑक्‍सिजनची गरज ओळखून येथील कृष्णा हॉस्‍पिटलनेही ऑक्‍सिजन प्लांट सुरू केला आहे. गरजेच्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी कृष्णा हॉस्पिटलने प्रति मिनिट ७०० लिटर, तर प्रति तास ४२ हजार लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल, असा प्लांट उभारला आहे. त्याचबरोबर त्या प्लांटमधून २४ तासांत १४४ सिलिंडर ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. दोन्ही मोठे प्लांट कार्यान्‍वित झाल्याने सध्या तरी कऱ्हाड ऑक्‍सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्णच झाले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sataraoxygenkarad
loading image
go to top