esakal | जुगार अड्ड्यांवरील छाप्यात साताऱ्यात चौघांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

जुगार अड्ड्यांवरील छाप्यात साताऱ्यात चौघांवर गुन्हा

सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जुगार खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. लाॅकडाऊनच्या काळात या प्रकारावर पाेलिसांनी नियंत्रण आणले हाेते. आता पुन्हा वाढत्या प्रकारावर पाेलिसांचा वाॅच असून कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे.

जुगार अड्ड्यांवरील छाप्यात साताऱ्यात चौघांवर गुन्हा

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : शहरातील विविध दोन ठिकाणी छापा टाकून शहर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. साईबाबा मंदिर परिसरात टाकलेल्या छाप्याप्रकरणी शाहीद शब्बीर सय्यद (रा. प्रतापगंज पेठ), समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा परिसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 500 रुपयांचा ऐजव जप्त करण्यात आला आहे. दुसरी कारवाई केसरकर पेठेतील पाण्याच्या टाकीच्या परिसरात झाली. या प्रकरणी सचिन रामचंद्र माने (रा. माची पेठ) व यासिन शेख (रा. गुरुवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

देवरुखात या दहा मुली साजरा करणार दिड दिवसांचा गणेशोत्सव

सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जुगार खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. लाॅकडाऊनच्या काळात या प्रकारावर पाेलिसांनी नियंत्रण आणले हाेते. आता पुन्हा वाढत्या प्रकारावर पाेलिसांचा वाॅच असून कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top