मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा

Corporator Pandurang Gunjawate
Corporator Pandurang Gunjawateesakal
Summary

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने शहा यांना लोखंडी गजाने डोक्यात मारहाण केलीय.

फलटण शहर (सातारा) : आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका बांधकाम व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन त्यास गजाने मारहाण केल्याप्रकरणी अभिजित जानकर याच्यासह फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक पांडुरंग गुंजवटे (Corporator Pandurang Gunjawate) यांच्यावर फलटण शहर पोलिस ठाण्यात (Phaltan City Police Station) गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की सागर सुधीर शहा (वय ३६ रा. गोळीबार मैदान, फलटण) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. गुरुवार (ता. २) रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहा हे फलटण नगरपरिषदेच्या पार्किंग गेटसमोर गाडी लावून चालले होते. त्यावेळी अभिजित जानकर (रा. शुक्रवार पेठ, फलटण) व नगरसेवक पांडुरंग गुंजवटे (रा. मलठण, फलटण) यांनी अगोदर झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन शहा यांच्या हाताच्या दंडावर अभिजित जानकर याने चाकू सारख्या हत्याराने वार केला.

Corporator Pandurang Gunjawate
पेरूच्या समुद्र किनारी सापडली 800 वर्षांपूर्वीची 'ममी'

पांडुरंग गुंजवटे यांनी लोखंडी गजाने डोक्यात मारहाण करत शहा यांना गुजरांनो तुम्हाला मस्ती आली आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. सदर मारहाणीत सागर शहा जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अभिजित जानकर व नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्याविरुध्द फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

Corporator Pandurang Gunjawate
पंचायत समितीच्या सभापतिपदी NCP च्या अश्विनी पवारांची बिनविरोध निवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com