तुमच्या प्रेमविवाहाने आमची इज्जत गेली आहे, असे म्हणत त्यांनी....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

या वेळी पतीने विरोध केल्यावर त्यांनाही संशयितांनी मारहाण केल्याचे वैष्णवी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत. 
 

सातारा : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मोळाचा ओढा परिसरात पती-पत्नीला मारहाण झाली आहे. याप्रकरणी दोघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण विठ्ठल सानप, राजकुमार विठ्ठल सानप (दोघे रा. शिवाजीनगर, जामखेड, जि. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत वैष्णवी सहर्ष घोलप (मूळ रा. शिक्षक कॉलनी, जामखेड, सध्या रा. वनअर्थ अपार्टमेंट, मोळाचा ओढा) यांनी फिर्याद दिली आहे.
 
वैष्णवी यांनी काही दिवसांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे संशयित तिच्यावर चिडून होते. काल त्या पतीसोबत घरात होत्या. त्यावेळी दोन्ही संशयित तेथे आले. तुमच्या प्रेमविवाहाने आमची इज्जत गेली आहे, असे म्हणत ते त्यांना जबरदस्तीने घेऊन निघाले होते. या वेळी पतीने विरोध केल्यावर त्यांनाही संशयितांनी मारहाण केल्याचे वैष्णवी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत. 

साताऱ्यातील 'या' गणेशाेत्सव मंडळाने कोराेनाच्या लढ्यासाठी दिले एक लाख 11 हजार 111 रुपये

प्रसंगी शिवेंद्रसिंहराजेंशी चर्चा करु  : आमदार शशिकांत शिंदे 

कोरोनाकाळात रिअल फायटर ठरली टीम तेजस्वी; गुन्हेगारीवरही आसूड 

महाबळेश्‍वर : शेतकरी, व्यापारी, लघू व मोठ्या कारखानदारांसाठी महत्वाची बातमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Two People For Scaring Newly Married Couple In Satara