लॉटरी लागल्याचे सांगत शाहूपुरीतील एकास 17 लाखांना फसविले

लॉटरी लागल्याचे सांगत शाहूपुरीतील एकास 17 लाखांना फसविले

सातारा : कौन बनेगा करोडपतीमध्ये लॉटरी आणि बीएमडब्ल्यू कार लागल्याचे सांगत शाहूपुरी येथील एकास 17 लाख 38 हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लनावे सरदार हरजितसिंह आणि राणाप्रताप सिंह (पूर्ण नाव पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल असलेल्यांची नावे आहेत.
 
शाहूपुरी येथील समता पार्कमध्ये राजेंद्र नारायण सांभारे (वय 62) हे राहण्यास आहेत. त्यांना ता. 18 सप्टेंबर ते ता. 19 ऑक्‍टोबर या कालावधीत फोन आले. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव लनावे सरदार हरजितसिंह असल्याचे सांगत केबीसीचा लॉटरी मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. फोन करणाऱ्याने सांभारे यांना तुम्हाला कौन बनेगा करोडपतीमध्ये 25 लाखांची लॉटरी आणि बीएमडब्ल्यू कार लागल्याचे सांगितले.

गुन्हेगारी माेडीत काढणे हेच माझे ध्येय : आंचल दलाल

याचकाळत राणा प्रतापसिंह नावाने एकाने फोन करत स्टेट बॅंक मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. फोन करणाऱ्या दोघांनी नंतरच्या काळात सांभारे यांच्या, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर मेसेज, फोटो व ऑडियो क्‍लिप पाठवून दिल्या. हे करतानाच त्या दोघांनी भारतीय चलन व लॉटरी टॅक्‍स भरावा लागेल, असे सांगत त्या व इतर कारणास्तव बॅंक ऑफ इंडियामध्ये 17 लाख 38 हजार भरण्यास सांगितले. रोकड भरल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सांभारे यांनी याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com