Satara Crime: 'सूरज्याला माझ्या समोर आणा, नाहीतर जिवंत सोडणार नाही'; शेअर मार्केटच्या पैशावरून जिवे मारण्‍याची धमकी

Satara Stock Market Crime: शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एका संशयितावर मल्हारपेठ पोलिस (Malharpeth Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Money Stock Market
Money Stock Marketesakal
Summary

सूरजला जिवंत सोडणार नाही,’ असे तो जोरजोराने ओरडू लागला.

मल्हारपेठ : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवलेले पैसे परत देण्याच्या कारणावरून घरात जाऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी पाटण येथील एका संशयितावर मल्हारपेठ पोलिस (Malharpeth Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार नाडे (ता. पाटण) येथे घडला आहे. मीना राजेंद्र डोंगळे (रा. नाडे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, ता. ४ जुलैला साडेआठ वाजण्याच्या सुमारास आमच्या राहत्या घरी पाठीमागील बाजूस सत्यजित पवार (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाटण) हा पांढऱ्या रंगाच्या कारमधून आला होता.

Money Stock Market
Vaibhav Naik : ..म्हणून शिंदे गटाचे 'ते' 16 आमदार अपात्र होणार; सुप्रीम कोर्टाचा दाखला देत नाईकांचं स्पष्टीकरण

त्याने मोठमोठ्याने ओरडून शिव्या देत दार उघडा, घरात कोण आहे? असे म्हणू लागला. त्यावेळी मी दार उघडले असता तो दार ढकलून घरात आला. ‘तुमचा सूरज कुठे आहे, त्याला समोर आणा. त्याने व त्याचा मित्र आदित्य थरवल याने माझे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे घेतले आहेत. सूरजला जिवंत सोडणार नाही,’ असे तो जोरजोराने ओरडू लागला.

Money Stock Market
CM Siddaramaiah : 'ते' सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

त्यावेळी त्याच्या हातात चाकूसारखे हत्यार होते. ‘सूरज्याला माझ्या समोर आणा, नाहीतर तुम्हाला एकालाही जिवंत सोडणार नाही.’ असे म्हणून मोठमोठ्याने शिव्या देऊ लागला, तसेच आम्हाला धमकी देऊन घरात इकडे तिकडे सूरजला शोधू लागला.

Money Stock Market
पूजेसाठी वापरला जाणारा 'कापूर' कशापासून तयार केला जातो? काय आहेत फायदे, झाड का होतंय दुर्मिळ; जाणून घ्या..

त्याला पाहून मी व जाऊ सुनीता भीतीने मोठमोठ्याने ओरडू लागल्यानंतर तो घरातून निघून गेला. शिवीगाळ, दमदाटी केली म्हणून माझी सत्यजित पवार याच्याविरुद्ध तक्रार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार पृथ्वीराज पाटील करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com