Vaibhav Naik : ..म्हणून शिंदे गटाचे 'ते' 16 आमदार अपात्र होणार; सुप्रीम कोर्टाचा दाखला देत नाईकांचं स्पष्टीकरण

मंत्रिपदासाठी आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) अधीर आहेत; पण भाजप त्‍यांना कदापिही मंत्री करणार नाहीत.
Shinde Group MLA
Shinde Group MLAesakal
Summary

शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार असल्‍याने भाजपने राष्‍ट्रवादीच्या काही आमदारांना आपल्‍याकडे घेतले आहे. गरज भासली तर आणखी आमदारांना ते फोडू शकतात.

कणकवली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मला अद्यापही नोटीस पाठविलेली नाही. नोटीस आली तर आम्‍ही जरुर उत्तर देऊ. शिंदे गटाचे १६ आमदार निश्‍चितपणे अपात्र होतील, असे मत आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी येथे पत्रकार परिषद व्यक्त केले.

मंत्रिपदासाठी आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) अधीर आहेत; पण भाजप त्‍यांना कदापिही मंत्री करणार नाहीत, असेही ते म्‍हणाले. ते म्‍हणाले, ‘‘ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली, असे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे; मात्र मला अद्याप कोणतीही नोटीस किंवा मेल आलेला नाही.

Shinde Group MLA
Maharashtra Politics Update : मुश्रीफांसारख्या दिग्गजाविरोधात जिद्दीनं लढा; 'या' नेत्याला मिळणार निष्ठेचं फळ, लोकसभेसाठी तीन नावं चर्चेत

नोटीस आलीच तर त्‍याला आम्‍ही योग्‍य उत्तर देणार आहोत. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू हेच असल्‍याचे शिक्‍कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. प्रभू यांचा आदेश आम्‍ही पाळला आहे. त्‍यामुळे आम्‍ही अपात्र होण्याची कोणतीही शक्‍यता नाही; पण शिंदे गटाचे १६ आमदार मात्र निश्‍चितपणे अपात्र होणार आहेत.’’

Shinde Group MLA
Kolhapur Politics : शिवसेना, राष्ट्रवादीमधील फूट कुणाच्या पथ्यावर? 'या' नेत्यांची भूमिका ठरणार निर्णायक

ते म्‍हणाले, ‘‘शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार असल्‍याने भाजपने राष्‍ट्रवादीच्या काही आमदारांना आपल्‍याकडे घेतले आहे. गरज भासली तर आणखी आमदारांना ते फोडू शकतात. पण, फोडा आणि वापरून घेऊ सोडून द्या, अशी भाजपची नीती आहे. त्‍यामुळे भाजपसोबत गेलेल्‍यांना कुठलंही भवितव्य नाही. मंत्रिपदासाठी कायम अधीर बसलेले आमदार नीतेश राणे दररोज शिवसेना नेत्‍यांवर टीका करत आहेत.

मात्र, त्‍यांच्या टीकेची कोणीही दखल घेत नाही. भाजपही त्‍यांना कदापि मंत्री करणार नाही. सिंधुदुर्ग भाजपचे नीतेश राणे आणि शिंदे गटाचे दीपक केसरकर हे सरकारमध्ये आहेत; पण दुसऱ्या जिल्ह्यातील रवींद्र चव्हाण यांना पालकमंत्री करण्यात आले. त्‍यामुळे राणेंना भाजपमध्ये किती स्थान आहे, हे दिसून आले आहे.’’

Shinde Group MLA
Deepak Kesarkar : '..तर दीपक केसरकर भाजपमध्ये जातील'; ठाकरे गटाच्या प्रवक्त्याचा मोठा गौप्यस्फोट

एसटीचे दीड कोटी थकविले

कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्‍या दारी, या उपक्रमाचा प्रारंभ केला. त्‍यासाठी गावागावांतून एसटी बसगाड्या कार्यक्रमस्थळी नेण्यात आल्या. एसटी बसगाड्यांचे दीड कोटी रुपये भाडे शासनाने एसटी महामंडळाला दिलेले नाही, अशीही टीका श्री. नाईक यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com