
छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पराक्रमाच्या अनेक गाथा आजवर आपण ऐकल्या आहेत.
शिवरायांचा 'हा' प्रसंग आठवला, तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पराक्रमाच्या अनेक गाथा आजवर आपण ऐकल्या आहेत. अशाच एका गाथेला आणि अर्थातच महाराजांच्या पराक्रमाला आजच्या म्हणजेच 10 नोव्हेंबर 2021 या दिवशी तब्बल 353 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही घटना आहे प्रतापगडावरील अफजलखान वधाची. हा दिवस शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) म्हणून साजरा केला जातो. मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या घटनेची आठवण करुन देणारा हा दिवस आहे.
प्रत्येक मराठ्याचं रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडली. स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला. हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहावा असा आहे. अफजलखानाचा (Afzal Khan) वध हा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा: पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये होणार पहिलं हिंदू मंदिर
अशा या दिवसाची आठवण म्हणून प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. प्रतापगडावर देवीची पूजा, ध्वजारोहण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक, पुष्पहार अर्पण असेच कार्यक्रम पार पडत आहेत. दरवर्षीप्रमाणं गडावरील देवीच्या मंदिरात पूजा करण्यात आली. याशिवाय महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीचंही आयोजन गडावर करण्यात आलं. यानंतर महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.
हेही वाचा: SDCCB : सातारा बँक निवडणुकीत दोन्ही राजे बिनविरोध
प्रतापगडावर झालेली अफजलखान आणि छत्रपती शिवरायांची भेट आणि त्या भेटीत अफजलखानाने दिलेला दगाफटका ज्यास तोडीस तोड असे शिवरायांनी दिलेले उत्तर आणि अफजलखानाचा केलेला वध या सर्व गोष्टी आजही तितक्याच ताज्या आहेत. मराठ्यांच्या साम्राज्यावर चाल करुन आलेल्या या हुशार, बलाढ्य, शक्तिशाली अफजल खानाला शिवाजी महाराजांनी आपल्या अचूक रणनीतीने ढेर केलं. या घटनेनं प्रजा सुखी झाली आणि स्वराज्यावर आलेलं संकट छत्रपतींनी पळवून लावल्यानं गावागावात आनंदोत्सव साजरा झाला होता.
Web Title: Celebrate Shiv Pratap Day 2021 At Pratapgad Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..