वाघांबाबत केंद्र सरकार ‘अलर्ट’ | Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger

सातारा : वाघांबाबत केंद्र सरकार ‘अलर्ट’

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ११ वर्षांत ट्रॅप कॅमेऱ्यात चार वेळा वाघाचे दर्शन झाल्याने व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संरक्षणाबाबत केंद्र सरकार ‘अलर्ट’ झाले आहे. त्यांनी राज्यातील वन विभागाला वाघांच्या संरक्षणासह त्यांच्या वास्तव्याचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. सह्याद्रीच्या कडेकपारीतील वाघांचे अस्तित्व म्हणजे निसर्ग देणगी आहे. येथे वाघ सामान्य नजरेत दिसणार नसल्याने त्यांच्या अस्तित्व खुणांचा अभ्यास करा, त्याचा अधिवास, भ्रमण मार्ग सुरक्षित ठेवा, चोरट्या शिकारींपासून वाघांचे संरक्षण करण्याचे वन खात्याला आदेश आले आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. सह्याद्रीत राखीव वनक्षेत्रांना लागून असलेल्या खासगी जमिनीदेखील वन्यजीवांच्या अधिवासासाठी महत्त्वाच्या असल्याने वन विभागाला त्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. चोरटी शिकारही श्वापदांच्या अधिवासाला धोकादायक आहे. शिकारींचे वाढते प्रमाण वाघांना धोकादायक आहे.

हेही वाचा: सातारा : वासोटा किल्ला पर्यटनाची भुरळ कायम

कोकणातून येणाऱ्या चोरट्या वाटा कायमच्या बंद करण्याची गरज आहे. व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी आहे. वाघांचे मुख्य खाद्य असलेल्या अशा प्राण्यांची संख्या वाढवण्यास गवताळ अधिवासाच्या निर्मितीचा कार्यक्रम वन विभागाला हाती घ्यावा लागणार आहे. अभयारण्य क्षेत्रामधील गावांचे १०० टक्के पुनर्वसन गरजेचे आहे. जंगलातील मोकळ्या जागेत गवताळे तयार केले पाहिजे. खासगी वनक्षेत्र आणि खाणीमुळे सह्याद्री व्याघ्र भ्रमणमार्ग जोडण्यासाठी वन विभागाने सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांतील आठ संवर्धन राखीव वनक्षेत्रांची (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) निर्मिती केली. सातारा जिल्ह्यातील जोर जांभळी ते कोकणातील तिलारीपर्यंत संवर्धनाची राखीव वनक्षेत्र आहेत. सह्याद्री व्याघ्रच्या उत्तरेला सातारा जिल्ह्यातील जोर जांभळी आरक्षित आहे. तो भाग वाघाच्या भ्रमण मार्गासाठी महत्त्वाचा असल्याने तोही सुरक्षित केला जाणार आहे.

...असे झाले वाघांचे दर्शन

  • इन्फ्रारेड कॅमेऱ्याने टिपली २०१० मध्ये पुसटशी छबी

  • चांदोली अभयारण्यात २०१८ च्या २४ मे रोजी वाघ कॅमेऱ्यात कैद

  • दांडेलीच्या पट्यात मे २०२० मध्ये प्रौढ वाघाचे छायाचित्र कॅमेराबद्ध

  • यंदा २९ एप्रिल २०२१ रोजी पुन्हा एकदा वाघाचे अस्तित्व

loading image
go to top