

CEO Yashni Nagarajan interacting with Banpuri villagers during Panchayati Raj Abhiyan visit; villagers inspired by her encouraging words.
sakal
ढेबेवाडी: ‘गावात तुम्ही काय केलेय हे बघायला आज आले आहे, पुढच्या वेळेस तुमच्या कौतुकाच्या सोहळ्यालाच पुन्हा इथे येईन,’ अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी आज बनपुरी (ता. पाटण) येथील ग्रामस्थ, पदाधिकारी आणि विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या पंखात आत्मविश्वास अन् प्रोत्साहनाचे बळ भरले.