चाफळच्या पर्यटन वैभवात भर; 'उत्तरमांड' जलाशयात बोटिंग सुरू

चाफळच्या पर्यटन वैभवात भर; 'उत्तरमांड' जलाशयात बोटिंग सुरू

सातारा ः सभोवती हिरव्यागार डोंगरदऱ्या, प्रसन्न आणि स्वच्छ हवा, विस्तीर्ण जलाशय अशी निसर्गाची मुक्त साथ लाभलेल्या उत्तरमांड प्रकल्पाच्या जलाशयात बोटिंग सुरू झाले. त्यातून चाफळच्या पर्यटन वैभवात भर पडली आहे. हिरव्या झाडीच्या डोंगरांच्या पायथ्याशी सदैव खळाळणाऱ्या निळ्याशार स्वच्छ आणि अथांग जलाशयात मनसोक्त विहरण्याचा आनंद पर्यटक लुटू लागले आहेत.
 
चाफळ (ता. पाटण) हे समर्थस्थापित श्रीराम मंदिरामुळे सर्वांच्या आवडीचे ठिकाण आहे. चाफळच्या सभोवती दाट झाडीचे डोंगर आहेत. निसर्गरम्य वातावरणात उत्तरमांड नदीच्या काठावर सुंदर मंदिर आहे. त्यामुळे येथे भाविक आणि पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी तीन मारुती मंदिरे येथे आहेत. नजीकच्या उंच डोंगराच्या समर्थांच्या तपश्‍चर्यचे ठिकाण रामघळ आहे. या बरोबरच पर्यटकांना जलाशयात विहरण्याचा आनंद घेता येईल.
 
चाफळच्या पश्‍चिमेस एक किलोमीटर अंतरावर एक टीएमसी क्षमतेचा उत्तरमांड प्रकल्प आहे. हा जलाशय कायमच पाण्याने भरलेला असतो. या जलाशयात आता बोटिंग सुरू झाले आहे. चाफळमधील उमेश पवार व सहकारी काका पाटील, विजय पवार आदी मित्रांनी श्रीराम बोटिंग क्‍लबची स्थापना केली. त्यासाठीच्या आवश्‍यक साहित्याची जमवाजमव केली. सर्व शासकीय परवाने रीतसर काढले. बोटिंगसाठी त्यांनी नामवंत कंपन्याकडून दहा सीटची इंजिन बोट, एक वॉटर स्कूटर आणि चार सीटची पॅंडल बोट खरेदी केली.

खूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली

जलाशयात विहरण्याचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 30 लाईफ जॅकेट आणली, तसेच बोटी चालविण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून बोटिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या दोन कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. माफक दरात पर्यटकांना जलाशयात मनसोक्त बोटिंग करण्याची संधी मिळत आहे. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग आणि जल पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी चाफळला पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com