esakal | धक्कादायक! गारुडीत कोरोना समितीच्या अध्यक्षाला मारहाण

बोलून बातमी शोधा

corona
धक्कादायक! गारुडीत कोरोना समितीच्या अध्यक्षाला मारहाण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कलेढोण (सातारा) : कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने विनामास्क गावातून फिरत असल्याचा जाब विचारल्याने दादा बापू पुकळे याने (गारुडी, ता. खटाव) येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ तुकराम सरगर यांना लोखंडी पंचने डोक्‍याला मारहाण केल्याची तक्रार मायणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गारुडीत कोरोना रुग्णांची संख्या अठ्ठेचाळीसवर पोचली आहे. दिवसागणिक वाढणारे रुग्ण वडूज, मायणी, खटाव व विटा, इस्लामपूर (सांगली) येथे उपचार घेत आहेत. वाढलेल्या रुग्णांमुळे गावकऱ्यांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरगर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की काल रात्री साडेसातच्या सुमारास दादा पुकळे हा विनामास्क फिरत असून, त्यास चांगदेव मंदिराजवळ कोरोना समितीसमोर हजर राहण्यासाठी मी फोन केला. त्यावर पुकळे यांनी मी येणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगीत फोन कट केला.

ऑक्‍सिजनसाठी 'महावितरण'चा आधार, 'नायट्रोक्‍सिजन'ला दिला वाढीव वीज भार

थोड्या वेळाने मंदिरासमोर पुकळे याने भरधाव वेगाने चारचाकी गाडी आणत. आपणास शिवीगाळ करीत लोखंडी पंचने डोक्‍यास मारहाण केली. मारहाणीत पुकळे याने 32 ग्रॅमची सोन्याची चैनही तोडून नेल्याची तक्रार सरगर यांनी दिली आहे. दरम्यान जखमी झालेल्या सरगर यांना रात्री ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मायणीत दाखल केले. त्यानंतर रात्री उशिरा सातारा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.

Edited By : Balkrishna Madhale