‘सह्याद्री व्याघ्र’च्या दक्षिण भागातही वाघांचा वावर

चंदगडमधील शिकारीमुळे मिळाले वास्तव्याचे पुरावे; वन विभागाच्या कॅमेऱ्याने टिपली छायाचित्रे
‘सह्याद्री व्याघ्र’च्या दक्षिण भागातही वाघांचा वावर
‘सह्याद्री व्याघ्र’च्या दक्षिण भागातही वाघांचा वावरsakal media

कऱ्हाड : कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात रेड्याच्या शिकारीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या वास्तव्याचे पुरावे वन विभागाच्या हाती आले आहेत. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडील ‘सह्याद्री’च्या कडेकपारीतील वन क्षेत्रांमध्ये वाघांच्‍या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘सह्याद्री व्याघ्र’च्या दक्षिण भागातही वाघांचा वावर
'येणाऱ्या काळात महाविकास आघाडी राहणार नाही' - श्वेता महाले

व्याघ्र प्रकल्पात दक्षिणेकडील कर्नाटकमधील दांडेली, भीमगड, महाराष्ट्रात तिलारी, दोडामार्ग, आजरा, भुदरगड, चंदगड, विशाळगडमार्गे उत्तरेत चांदोली व कोयनेपर्यंत वाघ भ्रमण करतो. लॉकडाउनच्या काळात आंबोली परिसरात वाघाचे छायाचित्र वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. तिलारी आणि आंबोलीच्या वनक्षेत्रांनी जोडलेल्या चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघांचा वावर समोर आला आहे. रेड्याच्या शिकारीवरून वाघाच्या अस्‍तित्वाच्या खुणा वन विभागातील अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत.

वाघ आणि इतर मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी कॉरिडोर कनेक्टिव्हिटी (भ्रमणमार्गाची जोडणी) अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दक्षिणेकडील कर्नाटकमधील दांडेली, भीमगड, महाराष्ट्रात तिलारी, दोडामार्ग, आजरासह उत्तरेत चांदोली, कोयना ते जोर-जांभळीपर्यंत भ्रमण करत असतो, हे अभ्यासावरून दिसत आहे व हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अतिशय सकारात्मक आहे.

गिरीश पंजाबी, व्याघ्र संशोधक, वाइल्डलाइफ कॉन्झर्वेषण ट्रस्टलारी संवर्धन राखीव, चंदगड संवर्धन राखीव, दोडामार्ग आंबोली संवर्धन राखीव, छत्रपती शाहू महाराज आजरा-भुदरगड संवर्धन राखीव, गगनबावडा संवर्धन राखीव, पन्हाळगड संवर्धन राखीव, विशाळगड संवर्धन राखीव तर एकीकडे राधानगरी वन्यजीव अभयारण्याला लागून आहेत तर दुसरीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य व पुढे जोर-जांभळी संवर्धन राखीवपर्यंत सलग लागून आहेत.

‘सह्याद्री व्याघ्र’च्या दक्षिण भागातही वाघांचा वावर
महिला मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत पंकजा मुंडेंपेक्षा 'या' नेत्या वरचढ

"भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर भक्षी प्राणी हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करू शकतात, हे अधोरेखित होते."

-डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com