Mahabaleshwar : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! महाबळेश्‍वरला जाताय? मग, 'या' मार्गात झालाय मोठा बदल

महाबळेश्‍वरकडून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही.
Traffic to Panchgani Mahabaleshwar
Traffic to Panchgani Mahabaleshwaresakal
Updated on

सातारा : गर्दी वाढल्यामुळे सात ते २५ जून या कालावधीत दर शुक्रवार, शनिवार व रविवारी पाचगणी व महाबळेश्‍वरकडे (Panchgani and Mahabaleshwar) जाणाऱ्या वाहतुकीत पोलिस अधीक्षक समीर शेख (Police Sameer Sheikh) यांनी बदल केले आहेत.

Traffic to Panchgani Mahabaleshwar
Akshay Bhalerao Case : आरोपीला काँग्रेसच्या आमदारानं लपवून ठेवलं; कवाडेंचा चव्हाणांवर गंभीर आरोप

या बदलानुसार मुंबई व पुण्याकडून येणाऱ्या वाहनांनी सुरूर फाटा-वाईमार्गे यायचे आहे; परंतु महाबळेश्‍वरकडून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही. या वाहनांनी महाबळेश्‍वरवरून मेढा-कुडाळ-पाचवड फाटा या रस्त्याने महामार्गाकडे जायचे आहे.

Traffic to Panchgani Mahabaleshwar
Dharashiv : 'तू तुझ्या औकातीत राहा भंगारचोर'; ठाकरे गटाच्या खासदारानं भाजप आमदाराला चांगलंच सुनावलं

पाचगणीवरून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी संजीवन विद्यालय-रुईघर-करहर-कुडाळ-पाचवड फाटा या मार्गे पुण्याकडे जायचे आहे. महाबळेश्‍वरवरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी मेढा-सातारा या रस्त्याचा उपयोग करायचा आहे. या वाहतूक बदलाबाबत काही हरकती असल्यास disttraffic.satara@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

JCB trapped in Kelghar Ghat landslide
Latest Koyna Dam storage update
Panchgani Municipality Faces Questions as Horse Pound Remains Only on Records
Shocking Crime in Mahabaleshwar: Pune Visitor Dies After Brutal Attack Outside Hotel
Marathi News Esakal
www.esakal.com