Akshay Bhalerao Case : आरोपीला काँग्रेसच्या आमदारानं लपवून ठेवलं; कवाडेंचा चव्हाणांवर गंभीर आरोप

फुले- शाहू आंबेडकरांच्या राज्यात जातीय द्वेष निर्माण होत आहे.
Nanded Akshay Bhalerao Case Jogendra Kawade
Nanded Akshay Bhalerao Case Jogendra Kawadeesakal
Summary

नांदेड जिल्ह्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे. मात्र, ते सामाजिक सलोखा चांगला ठेवण्यासाठी काही करताना दिसत नाहीत, ही खेदाची बाब आहे.

नांदेड : राज्यात दलितांवर अत्याचार वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करावी. तशी कायद्यात तरतूद आहे. ही बाब आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली.

बोंढार हवेली (ता. नांदेड) येथील अक्षय भालेराव (Akshay Bhalerao Murder Case) या तरुणाच्या हत्येची घटना नुकतीच घडली. या घटनेचा निषेध व भालेराव कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी प्रा. कवाडे (Jogendra Kawade) सोमवारी नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, राज्यात सत्ता परिवर्तन झाले पण जातीय मानसिकतेत बदल झाला नाही. फुले- शाहू आंबेडकरांच्या राज्यात जातीय द्वेष निर्माण होत आहे.

Nanded Akshay Bhalerao Case Jogendra Kawade
Loksabha Election : उदयनराजेंचं टेन्शन वाढलं; 'हा' नवा पक्ष विरोधात लढणार निवडणूक, राष्ट्रवादीचंही असणार आव्हान

'बोंढार गावात (Nanded) जयंती साजरी होत असताना सर्व जाती- धर्मातील लोक सहभागी झाले होते. परंतु, जातीची दहशत पसरवण्यासाठी अक्षय भालेरावचा खून करण्यात आला आहे. जातीय द्वेषातून अत्याचार होत आहेत. राज्यात मागसवर्गीयांवरील अत्याचाराच्या प्रमाणात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं हे थांबवण्याचं काम पोलिस प्रशासन, शासनाचं आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तेव्हाच वचक बसेल.' दरम्यान, या प्रकरणात आरोपीला काँग्रेसच्या आमदारानं लपवून ठेवण्यासाठी मदत केल्याचा आरोपही कवाडे यांनी केला.

Nanded Akshay Bhalerao Case Jogendra Kawade
Rishikant Shinde : राष्ट्रवादीत गद्दारी, पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळंच मी शिवसेनेत प्रवेश केला; शिंदेंच्या भावाची कबुली

चौकशीसाठी 'एसआयटी' नेमा

या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, भालेराव कुटुंबीयांचे पुनर्वसन व्हावे, कुटुंबीयांना २५ लाखाची आर्थिक मदत द्यावी, एकाला शासकीय नोकरीत घ्यावे, अशी मागणी असल्याचे कवाडे म्हणाले. पीआरपीचे राज्य उपाध्यक्ष बापूराव गजभारे, गोपाळराव हातोडे, विनोद गाभले, साहेबराव सोनकांबळे, रवी वाघमारे आदी उपस्थित होते.

Nanded Akshay Bhalerao Case Jogendra Kawade
Nanded : आंबेडकर जयंती केली म्हणून दलित तरुणाची निर्घृण हत्या; अशोक चव्हाण म्हणाले, 'वातावरण खराब करू नका'

माजी मुख्यमंत्र्यांकडून निषेधही नाही

नांदेड जिल्ह्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे. मात्र, ते सामाजिक सलोखा चांगला ठेवण्यासाठी काही करताना दिसत नाहीत, ही खेदाची बाब आहे. चव्हाण यांनी किमान या घटनेचा निषेध करणे आवश्यक आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय याकडे लक्ष देण्यात यावे, अशी आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही दखल घ्यावी. मी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार असल्याची माहितीही प्रा. कवाडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com