

Repeated Blasts Reported in Tasawade Industrial Area, Probe Underway
sakal
उंब्रज : तासवडे (ता. कऱ्हाड) एमआयडीसी येथील एका केमिकल कंपनीतील स्फोटांची मालिका कायम आहे. आज दुपारीही तेथे केमिकलचा एक कॅन फुटला. मात्र, त्याचा जास्त परिणाम जाणवला नाही; पंरतु आणखी बॅरल फुटण्याचा धोका कायम आहे. दरम्यान, काल रात्री पावणेदहाच्या सुमारासही आणखी भीषण स्फोट झाला. रात्री बाराच्या सुमारास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची व्हॅन या परिसरात दाखल होऊन तेथील माॅनिटरिंग सुरू केले आहे. आणखी स्फोट होण्याची भीती असल्याने तळबीड पोलिसांचा बंदोबस्त आहे. बहुतांश कंपनी मालकांनी कामगारांना सुटी दिली आहे.