esakal | किल्ले स्पर्धांतून बाळगाेपाळांना मिळतेय राष्ट्रभक्तीची शिकवण : शर्वरी पिल्लई
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले स्पर्धांतून बाळगाेपाळांना मिळतेय राष्ट्रभक्तीची शिकवण : शर्वरी पिल्लई

दिवाळीत कोरोना प्रादुर्भाव असतानाही यावर्षी 78 स्पर्धंकांनी किल्ला स्पर्धेत भाग घेतला.

किल्ले स्पर्धांतून बाळगाेपाळांना मिळतेय राष्ट्रभक्तीची शिकवण : शर्वरी पिल्लई

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी ठिकठिकाणी गडकोट उभे केले. हे गडकोट आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देत उबे आहेत. ते युवकांनी सतत राष्ट्रभक्तीची शिकवण आणि पराक्रमासाठी स्फुर्ती देत असतात. किल्ले स्पर्धांतून नव्या पिढीलाही स्फुर्ती मिळत आहे. या उपक्रमांमुळे छोट्या मुलांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम बिंबत असल्याने किल्ल्यांच्या स्पर्धा अधिकाधिक झाल्या पाहिजेत असे मत अभिनेत्री शर्वरी पिल्लई यांनी व्यक्त केले.

नवप्रकाश मंडळ भगवा कट्टा प्रतिष्ठान आणि ओंकार डेव्हलपर्सच्या विद्यमाने झालेल्या किल्ला स्पर्धेत लहान गटात आनंद शिंदे, मोठ्या गटात पंकज खागे, तर समूह गटात कामगार संघ (फिल्म ऑटोकॉम प्रा. लि.) यांनी प्रथम क्रमांक मिळविले. दिवाळीत कोरोना प्रादुर्भाव असतानाही यावर्षी 78 स्पर्धंकांनी किल्ला स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अभिनेत्री शर्वरी पिल्लई, बालकलाकार मैथिली पटवर्धन, श्री. शादाब यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी यशवंत लेले, सुनील संकपाळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप शिवदे उपस्थित होते.

Look Back 2020 : लाचेत महसूल सुसाट; पोलिसांचा नंबर दाेन 
 
स्पर्धेतील विजेते (अनुक्रमे पहिले तीन क्रमांक) समूह गट- कामगार संघ, फिल्म ऑटोकॉम प्रा. लि., शिवछावा ग्रुप, सारंग सोसायटी गंगापुरी, राजे ग्रुप फुलेनगर, उत्तेजनार्थ- छावा ग्रुप सिध्दनाथवाडी, शिवसह्याद्री करिअर ऍकॅडमी सिध्दनाथवाडी, आर. जे. एम. ग्रुप रविवार पेठ. मोठा गट- पंकज खागे गंगापुरी, विश्वजित जगताप नावेचीवाडी, अर्जुन गोंजारी सोनगीरवाडी, उत्तेजनार्थ- साईराज घाडगे गंगापुरी, शंभूराज शिंगटे, ओम कदम सोनगीरवाडी. छोटा गट- आनंद शिंदे, नावेचीवाडी, अपूर्व शिंदे गंगापुरी, मितेश महांगडे गंगापुरी, उत्तेजनार्थ- विघ्नेश जायगुडे दत्तनगर, समर्थ जगताप यशवंतनगर, अथर्व भिंगारे जेजुरीकर कॉलनी. सरसेनापती हिरोजी इंदलकर पुरस्कार अनुज ढगे (रविवार पेठ- शिवनेरी). हिरकणी पुरस्कार राणी तुषार चक्के (ढगेआळी- सुवर्णदुर्ग) यांना देण्यात आला.

याला म्हणायचं विश्वास! तहसीलदार, डीवायएसपीची मुले शिकणार सरकारी शाळेत 

Edited By : Siddharth Latkar

loading image