धावत्या गाडीतून वेळीच उडी मारल्याने साताऱ्यातील मुलगा बचावला

प्रवीण जाधव
Monday, 21 December 2020

केसरकर पेठेत उतारावरील रस्त्यावर एक चारचाकी उभी करण्यात आली होती. या वाहनामधील चार्जर आणण्यासाठी एका लहान मुलाला मालकाने सांगितल्याने त्याने दार उघडून तो चार्जर घेतला. मात्र, यावेळी त्याच्याकडून चुकून गिअर पडला गेल्याने गाडी न्यूट्रल झाली आणि रस्त्यावर धावू लागली.

सातारा : केसरकर पेठेत उतारावर पार्क केलेली चारचाकी गाडी अचानक सुरु होवून समोरील विजेच्या खांबाला धडक दिली. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे शहरात काहीकाळ गोंधळ उडाला होता.  

याबाबत अधिक माहिती अशी, केसरकर पेठेत उतारावरील रस्त्यावर एक चारचाकी उभी करण्यात आली होती. या वाहनामधील चार्जर आणण्यासाठी एका लहान मुलाला मालकाने सांगितल्याने त्याने दार उघडून तो चार्जर घेतला. मात्र, यावेळी त्याच्याकडून चुकून गिअर पडला गेल्याने गाडी न्यूट्रल झाली आणि रस्त्यावर धावू लागली. मुलाने गाडीतून उडी मारली. मात्र, ही कार समोरील विजेच्या खांबाला जावून धडकली. त्यामुळे जोरदार आवाज झाला व परिसरातील वीज गेली. यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर आले. सुदैवाने रस्त्यावर यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला.

UK ची विमान सेवा तात्काळ थांबवा : पृथ्वीराज चव्हाण

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Jumped From Four Wheeler Near Kesarkar Peth Satara News