Satara Crime: 'अत्याचार, बालविवाहप्रकरणी एकास अटक'; पीडित मुलीने पतीसह सहा जणांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद
Child Marriage and Atrocity Case: मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मयूर दत्तात्रय आवटे (रा. सुंदरनगर, लोणंद) याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही घरातील लोकांनी तिचा मयूर आवटे याच्याशी बालविवाह लावून दिला.
लोणंद : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी पीडित मुलीने पतीसह सहा जणांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या पतीस आज अटक करण्यात आली आहे.