esakal | धोकादायक! चायनीज मांजाचा पडतोय 'फास'; पक्षी होतायत जायबंदी I Chinese Manja
sakal

बोलून बातमी शोधा

Chinese Manja

नायलॉन मांजाने गळा कापल्‍याने सातारा जिल्ह्यात अनेकजण जखमी झाले आहेत.

धोकादायक! चायनीज मांजाचा पडतोय 'फास'; पक्षी होतायत जायबंदी

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : शहर आणि परिसरात शासनाचे आदेश डावलून चायजीन मांजा‍ची (Chinese Manja) विक्री आणि वापर सर्रास सुरू असल्‍याचे दिसून येत आहे. मानवासह पशुपक्ष्‍यांना धोका निर्माण करणारा हा मांजा कळत नकळत अनेकांच्‍या गळ्याचा फास बनत चालला आहे. या मांजाची विक्री, तसेच वापर करणाऱ्यांवर जिल्‍हा प्रशासनाने कडक कारवाई करणे आवश्‍‍यक आहे.

नायलॉन मांजाने गळा कापल्‍याने सातारा जिल्ह्यात अनेकजण जखमी झाले आहेत, तर अनेकांचे जीव गेल्‍याच्‍या घटना यापूर्वी घडल्‍या आहेत. यापूर्वीच्‍या काळात पतंगबाजीसाठी मैदानी मांजा तयार करण्‍यात येत असे. नंतरच्‍या काळात या मांजाची जागा चायनीज मांजाने घेतली. स्‍वस्‍तात मिळणाऱ्या या मांजामुळे अनेक घटना घडू लागल्‍या. या घटनांनंतर त्‍यावर बंदी घालण्‍यात आली. मात्र, ती कागदोपत्रीच आहे. सातारा शहरात राजरोस अनेक दुकानांतून बंदी घातलेल्‍या चायनीज मांजाची राजरोस विक्री होत असून, त्‍याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. पोलिसांनी तसेच वन विभागाने पुढाकार घेत पशुपक्ष्‍यांसह मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या मांजाची विक्री रोखणे गरजेचे आहे.

हेही वाचा: साताऱ्यात वनविभागाची धाड; 4 लाखांच्या इंद्रजालासह 80 किलो चंदन, 600 मोरपीस जप्त

चायजीन मांजा

चायनीज मांजा हा नायलॉनपासून बनविण्‍यात येतो. त्‍याला मोनो काईट, मोनो फिल्‍ड, मोनो गोल्‍ड, स्‍टील मांजा देखील म्‍हटले जाते. नायलॉनपासून बनविलेला हा धागा तंगूससारखा असतो. त्‍यामुळे तो सहजासहजी हाताने तुटत नाही. चीन व इतर ठिकाणी ड्रॅगन काईट उडविण्‍यासाठी त्‍याचा वापर होतो. मात्र, त्‍याचा सर्रास वापर त्‍याठिकाणी होत नाही. हा मानवी जीवितास धोका निर्माण करणारा असल्‍याने त्‍याच्‍या खुलेआम वापरावर चीनमध्‍ये देखील बंदी आहे.

हेही वाचा: एमआयएम मुस्लिमांसाठी 'यम', तर ओवैसी 'जीना पार्ट टू'

मैदानी मांजाचा वापर

पूर्वीच्‍या काळी फावडा छाप धाग्‍याचे रिळ आणून मांजा तयार करण्‍यात येत असे. बंद पडलेल्‍या ट्यूब लाइट, बल्‍ब, सोडा वॉटरच्‍या बाटलीची काच कुटून त्‍याची बारीक राळ तयार करण्‍यात येत असे. शाबुदाण्‍याच्‍या मदतीने लुगदी करत त्‍यात काचेची राळ मिसळून रंगीबिरंगी मांजा तयार करण्‍यावर यापूर्वी भर देण्‍यात असे. मांजाची धार वाढण्‍यासाठी त्‍याला नंतर दोन वेळा काचेची राळ सुती कपड्यातून लावण्‍यात येत असे. या मांजापासून कमी धोका निर्माण होतो.

loading image
go to top