esakal | दिवशी घाटातील कसरत थांबणार कधी?; संतप्त वाहनचालकांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Divashi Ghat

दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असताना घाटातील सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग फारशा गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही.

दिवशी घाटातील कसरत थांबणार कधी?; संतप्त वाहनचालकांचा सवाल

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : सतत वाहतुकीचा ताण सोसणाऱ्या ढेबेवाडी-पाटण मार्गावरील (Dhebewadi-Patan Road) दिवशी घाटात (Divashi Ghat) रस्ता रुंदीकरणासह फरशी पूल व अन्य आनुषंगिक कामे कासव गतीने सुरू असल्याने वाहनचालकांची कसरत होत आहे. दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधितांनी डोळे उघडून आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांतून होत आहे. (Citizens Demand That The Public Construction Department Pay Attention To Divashi Ghat Satara Marathi News)

ढेबेवाडी-पाटण मार्गावरील दिवशी घाट धोकादायक स्थितीमुळे नेहमीच चर्चेत असतो. दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असताना घाटातील सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Construction Department) फारशा गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. सूचना फलकांचा अभाव, निसटण्याच्या स्थितीतील दरडी, अरुंद रस्ते, तीव्र उतार व धोकादायक वळणे अशा परिस्थितीत सुरू असलेली घाटातील वाहतूक अपघाताला सुरवातीपासूनच निमंत्रण देत आहे. घाटात वन आणि बांधकाम विभागाची हद्द एकमेकाला लागून असल्याने सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्यावर मर्यादा येत आहेत. दरडी वनविभागाच्या (Forest Department) हद्दीत तर रस्ता बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्यामुळे वारंवार तेथे पेच निर्माण होत आहे.

हेही वाचा: 'कृष्णा'च्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसलेंची बिनविरोध निवड

काही वर्षांपासून घाटातील रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच ठिकठिकाणी नवीन फरशी पुलांचे बांधकाम सुरू असले, तरी कशाला कशाचा ताळमेळ नसल्यासारखी तेथे परिस्थिती आहे. एसटी बससह अन्य वाहनांची दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असणारी ये- जा लक्षात घेऊन घाटात बांधकाम सुरू असताना आवश्यक काळजी घेणे गरजेचे असतानाही तसा प्रयत्न झालेला दिसत नाही. खोदकाम केलेल्या ठिकाणी अरुंद व तीव्र वळणाचा रस्ता असून वाहनचालकांची तेथे फसगत होत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी याच घाटातून सतत ये- जा करत असताना त्यांना हा धोका कसा दिसत नाही, असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांतून उपस्थित होत आहे.

Citizens Demand That The Public Construction Department Pay Attention To Divashi Ghat Satara Marathi News

loading image