esakal | सदाशिवगडाच्या विकासासाठी रस्त्यावर उतरू; हजारमाचीसह पाच गावांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Sadashivgad

सदाशिवगडच्या विकासकामाबद्दल अफवा पसरवून गडाच्या विकासाला खो घालणाऱ्यांविरोधात पाचही गावचे आबालवृद्ध रस्त्यावर उतरू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सदाशिवगडाच्या विकासासाठी रस्त्यावर उतरू

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : सदाशिवगडाच्या (Sadashivgad) विकासकामाबद्दल अफवा पसरवून गडाच्या विकासाला खो घालणाऱ्यांच्या विरोधात पाचही गावचे आबालवृद्ध रस्त्यावर उतरू, असा इशारा हजारमाची-सदाशिवगड, बाबरमाची, राजमाची, वनवासमाची, विरवडेच्या ग्रामस्थांनी दिला. सदाशिवगडाचा रस्त्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी प्रयत्न केले आहेत. त्याव्दारे भागात पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न होत असताना विध्वंसक वृत्ती त्याला रोखू पाहात आहेत. ते आम्ही चालून देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Citizens Of Hazaramachi Babarmachi Rajmachi Villages Warn The Government For The Development Of Sadashivgad bam92)

सदाशिवगडालगतच्या पाच गावांतील ग्रामस्थांनी पत्रकारांसमोर भूमिका जाहीर केली. हजारमाचीच्या सरपंच विद्या घबाडे, उपसरंपच प्रशांत यादव, बाबरमाचीच्या सरपंच सुनीता कदम, उपसरपंच राहुल कांबळे, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, विरवडे येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे (Sahyadri Co-operative Sugar Factory) संचालक रामदास पवार, माजी उपसरपंच अधिक शिंदे, हजारमाचीचे दीपक लिमकर, अॅड. सी. बी. कदम, प्रल्हाद डुबल, पोलिस पाटील मुकुंद कदम, अॅड. दादासाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्‍थित होते.

हेही वाचा: ऐतिहासिक किल्ले धोक्यात; शिवरायांच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न!

सदाशिवगड हा टेहळणीचा किल्ला आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक (Historic Forts) महत्त्‍व अबाधित ठेवून विकास होणार आहे. मात्र, त्याबाबत अफवा पसरवून चुकीची माहिती सांगितली जात आहे. त्यांनी अफवा पसरवणे त्वरित थांबवावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. अॅड. कदम म्हणाले,‘‘ ट्रेकिंगच्या नावाखाली काहीजण विनाकरण विकासात अडथळा आणत आहेत. पाणी योजनेत त्यांनी चांगले काम केले. त्यावेळी त्यांना पाचही गावांनी साथ दिली. आता गडावर रस्ता होत असताना त्यांनी गावाला विरोध करणे योग्य नाही.’’ मावळा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कृष्णत काळे यांनी प्रतिष्ठानचे नाव वापरून होणाऱ्या विरोधात आम्ही सहभागी नाही, असे सांगितले.

हेही वाचा: 'बंधाऱ्यातील पाणी उडी मारून शेतात जाणार का?'

चर्चेला कधीही या : यादव

सदाशिवगडावर होणाऱ्या रस्त्यामुळे पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटीलही त्यात पुढाकार घेत आहेत. विकासाला विरोध करण्यापेक्षा सदाशिवगडासाठी त्यांनी आमच्या सोबत यावे, विरोध करणाऱ्यांनी कधीही कोठेही चर्चला बोलवावे, त्यांचे आम्ही स्वागत करून त्यांना या कार्यात सहभागी करून घेऊ, असे आवाहन हजारमाचीचे उपसरंपच प्रशांत यादव यांनी केले.

Citizens Of Hazaramachi Babarmachi Rajmachi Villages Warn The Government For The Development Of Sadashivgad bam92

loading image