

Karad: Bus stand ranks third in Pune Division’s cleanliness drive; Medha first, Mhaswad third in Category ‘K’.
Sakal
कऱ्हाड : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत एसटी महामंडळाने दुसऱ्या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला. त्यात पुणे विभागात अ वर्ग बसस्थानकात कऱ्हाड आगाराने तृतीय क्रमांक पटकावला. क गटात जिल्ह्यातील मेढा आगाराने प्रथम, तर म्हसवड बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकावला. हे अभियान एसटी बसस्थानकांना स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी राबवले जाते.