

Shivrendra Singh Raje Secures Approval for IT Park; Satara Set for Tech Growth
Sakal
सातारा: सातारा जिल्ह्यातील युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी यासाठी सातारा जिल्ह्यात आयटी पार्क व्हावे, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून नागेवाडी (ता. सातारा) येथील ४२ हेक्टर ८७ आर इतकी जागा आयटी पार्क साठी औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली असून सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.