
कोपर्डे हवेली : नडशी (ता. कऱ्हाड) येथील तळी नावाच्या शिवारात सकाळी अकराच्या सुमारास बिबट्याने दुचाकीस्वार समाधान माने यांच्यावर हल्ला केला. पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वार अमोल पवार याने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. त्यामुळे समाधान माने थोडक्यात बचावले. यात माने यांना कोणतीही इजा झाली नाही.