
सातारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होऊन कामाला सुरुवात करावी. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे स्वबळावर लढताना युतीतील घटक पक्षांशी सामोपचाराचे धोरण ठेवून टोकाची टीका टाळा, अशी सूचना या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. साताऱ्याची सर्व जबाबदारी जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्याकडे दिली आहे.