
कास ः जावळी तालुक्याचे मुख्यालय म्हणून मेढा शहराकडे पाहिले जाते. नजीकच्या बिभवी गावच्या हद्दीत एक पेट्रोल पंप असून, या ठिकाणी काही दिवसांपूर्वी सीएनजी गॅस सुविधा सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः मुंबईकर नागरिक खूष आहेत. मात्र, ही सुविधा वाहनचालकांसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ झाली आहे.