esakal | "महानंद' ने घेतली राज्यातील दूधाची जबाबदारी; 97 कोटींचा निधी मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

"महानंद' ने घेतली राज्यातील दूधाची जबाबदारी; 97 कोटींचा निधी मंजूर

या दूध भुकटी पॅकिंग, वितरणाची जबाबदारीही "महानंद'वर आहे. त्यासाठी 97 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पवार यांनी दिली.

"महानंद' ने घेतली राज्यातील दूधाची जबाबदारी; 97 कोटींचा निधी मंजूर

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : राज्यात एक सप्टेंबर ते 31 ऑक्‍टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत दूध स्वीकृती, प्रक्रिया व वितरणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघावर (महानंद) सोपविण्यात आली आहे. "महानंद' ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल, असा विश्‍वास संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी व्यक्त केला.
 
दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी "महानंद'ला भेट देऊन पाहणी केल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. त्यावेळी "महानंद'चे अध्यक्ष रणजित देशमुख, संचालक प्राजक्ता धस, रामकृष्ण बांगर, राजेंद्र सूर्यवंशी, विष्णू हिंगे, सुभाष निकम, व्यवस्थापक अनुदीप दिघे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील लॉकडाउन परिस्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दुधाच्या नियोजन योजनेस 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

Video : मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे आक्रमक! तमिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का?

या योजनेंतर्गत सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये प्रतिदिन 10 लाख लिटरप्रमाणे सहा कोटी दहा लाख लिटर दुधाची स्वीकृती अपेक्षित आहे. त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रुपांतरण करण्याची जबाबदारी "महानंद'वर सोपविली असून त्यासाठी 198 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या दोन महिन्यात 4,421 मेट्रिक टन दूध भुकटी उत्पादित होईल. या दूध भुकटी पॅकिंग, वितरणाची जबाबदारीही "महानंद'वर आहे. त्यासाठी 97 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पवार यांनी दिली.

शोध कोरोनाबाधितांचा : आजपासून सातारा जिल्ह्यात प्रत्येक घरात तपासणी माेहिम 


Edited By : Siddharth Latkar