
म्हसवड : येथून जवळच मालट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात लोणार खडकी (ता. माण) येथील युवकाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे. ओंकार रमेश खांडेकर (वय १९) असे या युवकाचे नाव आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन घरी परततानाच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.