
सातारा : रेल्वे प्रवासादरम्यान दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सवलतीमध्ये कर्णबधिर व मूकबधिर दिव्यांगाबाबत होणाऱ्या दुजाभावाबाबत चौकशी करून तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिव्यांग आयुक्तालयाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी दिले आहेत. दिव्यांगांच्या या अडचणींबाबत कालगाव (ता. कऱ्हाड) येथील अनिल पुजारी यांनी आयुक्तांसमोर मुद्दा उपस्थित केला होता.