कॉंग्रेसतर्फे महागाईविरोधात उद्या कऱ्हाडला रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंग्रेसतर्फे महागाईविरोधात उद्या कऱ्हाडला रॅली

कॉंग्रेसतर्फे महागाईविरोधात उद्या कऱ्हाडला रॅली

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण काँग्रेसतर्फे आजपासून महागाई विरोधात जनजागरण अभियान सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून उद्या (सोमवारी) कऱ्हाड शहरात काँग्रेस पक्षाची महागाई विरोधात जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. उद्या (सोमवारी) सकाळी साडेदहा वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून रॅलीला होणार सुरुवात होणार आहे. पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार उपक्रमांचे आयोजन केले आहे.

हेही वाचा: बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयाचा खुलासा

महागाई विरोधात जनजागरण अभियानाच्या प्रारंभी सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, काँग्रेस शहराध्यक्ष राजेंद्र माने, काँग्रेस दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडानाना जगताप, विद्याताई थोरवडे, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक इंद्रजीत गुजर, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाअध्यक्ष झाकीर पठाण उपस्थित होते.

हेही वाचा: बार्शी : आमदार राऊत यांच्या अंगावर केमिकल टाकण्याचा प्रयत्न

पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीपासून पंधरा दिवस अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याव्दारे केंद्रामुळे निर्माण झालेली महागाई व अर्थव्यवस्थेची दुरावस्थेची विस्तृत माहिती जनतेपर्यंत पोचवली जाणार आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारांवरील अन्याया विरोधात काँग्रेसने विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीदेखील झोपी गेलेले मोदी सरकार जागे होत नाही.म्हणून त्या वाढत्या महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी जनजागरण अभियान हाती घेण्यात आले आहे.

loading image
go to top