esakal | लसीकरणावरुन कऱ्हाडात घाणेरडं राजकारण; कॉंग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे धाव
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

लसीकरणावरुन कऱ्हाडात घाणेरडं राजकारण; कॉंग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे धाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाला रोखण्याचे सांघिक प्रयत्न कोठेच नसताना केवळ शासकीय यंत्रणेवर दबाव आणून लसीकरणाचे श्रेय लाटण्याचे कऱ्हाडात सुरू असलेले घाणेरडे राजकारण व लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप वेळीच थांबावा, असा इशारा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना दिला.

शहराध्यक्ष राजेंद्र ऊर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, माजी नगरसेवक व कॉंग्रेसचे पदाधिकारी अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे यांच्या शिष्टमंडळाने पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. कोरोना काळातही पोस्टरबाजी करणाऱ्या नगरसेवकांना ताकीद देण्याची मागणी केली. कोरोनातील लसीकरणाची सुविधा शासनातर्फे दिल्या जात आहेत.

आता दंडुक्याचीच गरज! जिल्ह्यात टाळेबंदीतही नागरिक रस्त्यावर

मात्र, त्या आम्हीच केल्याचे जनतेला सांगून काही नगरसेवक दिशाभूल करत आहेत. ती फसवणूक थांबवून त्यांनी लावलेले पोस्टर काढण्यास सांगावे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. या वेळी पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, शासनाने राबविलेल्या कोरोना लसीकरण आपणच राबविल्याचा अविर्भावात अनेक नगरसेवकांनी फ्लेक्‍स लावले आहेत. राजकीय हेतूने नगरसेवक शासनाच्या योजनांचा फायदा उठवत आहेत. त्या सगळ्या राजकीय गोष्टींना आळा घालण्यासाठी व त्या नगरसेवकांनी लावलेले फ्लेक्‍स काढण्याचे आदेश द्यावेत.

Edited By : Balkrishna Madhale