फलटणमधील रस्त्यांसाठी कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा

फलटणमधील रस्त्यांसाठी कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा

फलटण (जि. सातारा) : शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट बनली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी फलटण तालुका कॉंग्रेसच्या वतीने नगरसेवक सचिन सूर्यवंशी- बेडके केली आहे. याबाबतचे निवेदन महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना देण्यात आले. 

कॉंग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते पंकज पवार, आमीर शेख, सिद्धार्थ दैठणकर, शरद सोनवणे, सुनील गायकवाड, प्रीतम जगदाळे, अशोक शिंदे, विजयकुमार भोसले, शंकरराव लोखंडे, एल. जी. बेंद्रे, अतुल कांबळे, मोहित बार्शीकर, सोपान जाधव आदी उपस्थित होते. 

या वेळी मुख्याधिकारी काटकर यांनी कॉंग्रेसच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून ज्याठिकाणी भुयारी मलनिस्सारण वाहिन्यांची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागात रस्त्यांची कामे पाऊसकाळ थांबताच सुरू केली जातील, असे सांगितले. 
 
संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com