
सातारा: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’वरून निवडणूक आयोगाला घेरले आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात ‘वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ हू’ या उपक्रम सुरू केला आहे. साताऱ्यात जिल्हा काँग्रेस भवनातून जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.