esakal | शिवसेनेला कमी लेखण्याची चूक करु नका; उदय सामंतांचं राजेगटाला ओपन चॅलेंज I ShivSena
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

साताऱ्यात आम्ही संख्येने दिसायला कमी जरी असलो तरी आम्हाला कमी लेखू नका. राजकारणात काही घडू शकते.

शिवसेनेला कमी लेखण्याची चूक करु नका : उदय सामंत

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Satara Local Body Election) शिवसेना (ShivSena) पूर्ण क्षमतेने लढणार असून, धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवार लढतील. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सूत्र असणार का, याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घेणार आहेत. सातारा पालिकेच्या किमान 15 जागा आम्ही लढवू, यश किती कसे असेल माहीत नाही; पण चिवट संघर्ष हा सेनेचा बाणा आहे, अशी माहिती उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सातारा तालुका व शहर परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सामंत म्हणाले, ‘‘सातारा शहरात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा प्रथमच होत आहे. संघटनात्मक पातळीवर शाखा विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून शिवसेना सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण क्षमतेने व पक्षचिन्हावर लढण्याची धारणा आम्हा शिवसैनिकांची आहे; पण राजकारणात काही तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात.’’

राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र राबविण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, तो जे आदेश देतील. त्या आदेशाला आम्ही शिवसैनिक म्हणून बांधील असू, अशी ग्वाही त्यांनी दिली. साताऱ्यातील राजेगटाचा प्रभाव, सेनेची सुप्तावस्थेतील महिला आघाडी आणि संघटनात्मक बांधणीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर किती यश मिळणार, या प्रश्नांना सामंत यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘‘साताऱ्यात आम्ही संख्येने दिसायला कमी जरी असलो तरी आम्हाला कमी लेखू नका. राजकारणात काही घडू शकते, कोणाचा कसा उदय होईल याचा नेम नाही. साताऱ्यात राजेगटाचा प्रभाव असला, तरी जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीची सुरुवात साताऱ्यातून आहे. ही आमची पहिलीच बैठक आहे. सेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावर उमेदवार लढतील. सातारा पालिकेच्या किमान पंधरा जागा आम्ही लढवू, यश किती, कसे असेल माहीत नाही; पण चिवट संघर्ष हा सेनेचा बाणा आहे.’’

हेही वाचा: ..त्या उदयनराजेंवर मला काहीच बोलायचं नाही : अजित पवार

साताऱ्यातील सेनेच्या राजकीय हालचाली गृह राज्यमंत्र्यांना मान्य आहेत का? असे विचारताच सामंत म्हणाले, ‘‘सर्व गोष्टीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. तो आदेश गृह राज्यमंत्रीही मान्य करतात. सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची आमची भूमिका ठरली आहे. त्यामुळे साताऱ्यात प्रभाग तेथे शाखा हे उद्दिष्ट मी ठेवले आहे. त्याच्या पूर्तीसाठी मला साताऱ्यात बोलवा मी तयार आहे.’’ भाजपची महाविकास आघाडीवर वारंवार टीका होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री संयमी असून, आमचे लक्ष विकासावर आहे. उत्तर आम्ही पण देऊ शकतो. या टीकेला साताऱ्यात महिला आघाडीने उत्तर दिले म्हणजे आघाडी सक्रिय नाही असे नाही. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून संघटनात्मक बांधणीचे पश्चिम महाराष्ट्रात काम सुरू आहे, याचे परिणाम तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसतील.’’

हेही वाचा: 'निवडणुकीत तिकीट फिक्स समजू नका; आता पॅरामीटर लावूनच तिकीट'

loading image
go to top