
सातारा : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर जिल्ह्यात पुन्हा सक्षम विरोधक म्हणून काँग्रेसला उभारी देण्यासाठी जिल्हाध्यक्षपदाची खांदेपालट होणार आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्षम चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. सध्यातरी जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, अजित पाटील-चिखलीकर अशा निष्ठावंतांपैकी एखाद्यास संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. काँग्रेसची धुरा सांभाळून जिल्ह्यात पक्षाची सक्षम बांधणी करणारा व प्रसंगी आर्थिक झळ सोसणाऱ्या निष्ठावंताला जबाबदारी दिली जाणार का? याबाबतची उत्सुकता आहे.