कॉंग्रेसची महागाई विरोधात रॅली; पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं बैलगाडीचं सारथ्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंग्रेसची महागाई विरोधात रॅली; पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं बैलगाडीचं सारथ्य

कॉंग्रेसची महागाई विरोधात रॅली; पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं बैलगाडीचं सारथ्य

sakal_logo
By
(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कऱ्हाड (सातारा) : भाजप हटाओ, देश बचाओ.. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत.. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा.., पृथ्वीराज बाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे.. अशा घोषणांनी शहरातील परिसर दणाणून गेला. कॉंग्रेसनं माहगाईच्या विरोधात काढलेली रॅली आज उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत बैलगाडीतून सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्त्ेही उत्साहात होते.

हेही वाचा: भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

काँग्रेसतर्फे आजपासून महागाई विरोधात जनजागरण अभियान सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून आज शहरात काँग्रेस पक्षाची महागाई विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष राजेंद्र माने, काँग्रेस दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडानाना जगताप, विद्याताई थोरवडे, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक इंद्रजीत गुजर, सागर जाधव, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाअध्यक्ष झाकीर पठाण जावेद शेख, गणेश गायकवाड अमीर कटापुरे यांच्याह महिला उपस्थित होेते. कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. मुक्या बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वळसा घालून रॅलीचा समारोप येथील तहसीलदार कार्यालयसमोर झाला. तेथे जाहीर सबेत रूपांतर झाले.

हेही वाचा: चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार रॅलीचे आयोजन केले होते. पंधरा दिवस अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याव्दारे केंद्रामुळे निर्माण झालेली महागाई व अर्थव्यवस्थेची दुरावस्थेची विस्तृत माहिती जनतेपर्यंत पोचवली जाणार आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारांवरील अन्याया विरोधात काँग्रेसने विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीदेखील झोपी गेलेले मोदी सरकार जागे होत नाही.म्हणून त्या वाढत्या महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी जनजागरण अभियान हाती घेण्यात आले आहे, असी माहिती यावेळी देण्यात आली.

loading image
go to top