केंद्रातील मोदी सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : पृथ्वीराज चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan

'तुम्ही-आम्ही केंद्रातील सरकार घालवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही'

'केंद्रातील मोदी सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : तुमचं अन् आमचं काय वेगळा आहे का... तुम्ही-आम्ही केंद्रातील सरकार घालवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही... अशा शब्दांत बळीराजा शेतकरी संघटनेच्या (Baliraja Shetkari Sanghatana) नेत्यांशी चर्चा करत थेट त्यांच्या कंम्पूत जावून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमच्या सोबत या, असं आवाहन केलं. आमदार चव्हाण यांनी थेट संवाद साधत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या केलेल्या चौकशीनं अचंबित झाले. पाच मिनिट त्यांच्याशी संवादानंतर आमदार चव्हाण चर्चा करून योग्य मार्ग काढू, असंही त्यांना आश्वासन दिले.

कॉंग्रेसच्या (Congress) महागाईविरोधात रॅलीचा समारोप येथील तहसीलदार कार्यालयाबाहेर झाला. तेथेच बळीराज शेतकरी संघटना एकरकमी एफआरपीसाठी आंदोलनास बसली आहे. कॉंग्रेसची रॅली व कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर आमदार चव्हाण यांनी थेट बळीराजाच्या आंदोलन स्थळी भेट दिली. आमदार चव्हाण यांच्या भेटीने शेतकरी संघटनेचे पदाधिकारीही आनंदीत झाले. तुमची-आमची वेगळी मागणी आहे का, मग रॅलीत सहभागी झाला असता, तरी चाललं असतं. केंद्र सरकारला घरी बसविल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही, असा संवाद साधत आमदार चव्हाण यांनी अध्य़क्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांची चौकशी केली. त्यांनीही त्यांच्या समस्या सांगितल्या.

हेही वाचा: काहीही बरळणाऱ्यांना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो : पृथ्वीराज चव्हाण

कारखाने एफआरपी देत नाहीत, अशी समस्या बळीराजाच्या पदाधिकाऱ्यांना सांगताच आमदार चव्हाण म्हणले, ज्या कारखान्यानी एफआरपीची अमंलबजावणी केली नाही. त्यांच्यावर तुम्ही केसेस घातल्या आहेत का, कागदपत्रे दाखल करा, तुम्हाला न्याय निश्चित मिळेल. जो कारखाना काही करत नाहीत. त्या विरोधात तुम्हा कार्टात गेला आहे का, तसे केले तर तुम्हाला निश्चित न्याय मिळेल, असे वेगवेगळे लढून उपयोग नाही. सगळ्यांनी एकत्रित लढले पाहिजे. यावेळी पंजाबराव पाटील, साजीद मुल्ला यांच्याशी आमदार चव्हाण यांनी संवाद साधला.

हेही वाचा: विंचू चावला... 3 ठार, 500 जखमी! वादळामुळे विंचवांची दहशत

loading image
go to top