Karad Politics:'कॉंग्रेसच्या ऋतुराज मोरेंना अर्जांच्या छाननीत फटका', कऱ्हाडला ६८ इच्छुकांचे तर नगराध्यक्षपदाचे पाच अर्ज बाद

Nomination Shock in Karad: ऋतुराज मोरे यांनी यशवंत विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्या अर्जावर आघाडी प्रमुखांची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
Election officials in Karad checking nomination documents as several forms, including mayoral applications, get rejected.

Election officials in Karad checking nomination documents as several forms, including mayoral applications, get rejected.

Sakal

Updated on

कऱ्हाड: कऱ्हाड (जि.सातारा) नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काल सोमवारअखेर नगराध्यक्ष पदासाठी २२ तर नगरसेवक पदासाठी ३३० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्याची छाननी आज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, निवडणूक निरीक्षक ज्योती कावरे यांच्यासमोर झाली. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल अर्जापैकी पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले तर १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले. नगरसेवक पदासाठी दाखल अर्जापैकी ६८ अर्ज अवैध ठरले असुन २६२ अर्ज सध्या शिल्लक असुन त्यातील एका अर्जावरील निर्णय़ राखुन ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले. ऋतुराज मोरे यांनी यशवंत विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्या अर्जावर आघाडी प्रमुखांची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com