

Narendra Patil Levels Sharp Accusations Against MDs, Mentions Deshmukh
Sakal
कऱ्हाड : मराठा समाजातील तरुण उद्योजक होऊ नयेत, याची सुपारी वाजवण्याचे काम महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख करत असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला. त्यांनी ज्यावेळी हे वातावरण चिघळू लागले, त्यावेळी एमडींनी एलवाय देण्यासाठी सुरुवात केली. मात्र, त्यासाठी जाचक अटी लावल्या असून, ग्रामीण भागातील शेतकरी, तरुण कोणत्याच योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही, असे कारस्थान त्यांनी रचल्याचाही आरोप केला.