
मलकापूर : महामार्गावर उभ्या असलेल्या मालट्रकला कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. या मालासह वाहनांचे नुकसान झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर नागरिकांनी ट्रकमधील बिअरच्या बाटल्या पळवल्याचे सांगण्यात येते. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.