
खटाव : कधी नव्हे ते मे महिन्यात बरसलेल्या संततधार पावसामुळे शेत शिवारात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्वीची कामे खोळंबली असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. येथील येरळा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.