

Seized copper wires and equipment recovered from the accused during the police operation.
Sakal
पाटण : तालुक्यातील सडावाघापूर, सडादाढोली व अन्य परिसरातील एका कंपनीच्या पवनचक्क्यांतील तांब्याच्या तारा असलेली केबल चोरी करणारी टोळी साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतली. त्यांच्याकडून टेंपोसह १८ लाख ८० हजार १४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सारीश संजय सावरवाडे (वय २३, रा. आगाशिवगकर, ता. कऱ्हाड, मूळ रा. आष्टा, वाळवा, जि. सांगली), प्रमोद सुरेश निकम (२६, मसूर), दत्तात्रय जगन्नाथ झोरे (१९, रा. सडावाघापूर, पाटण), नीलेश श्रीमंत सूर्यवंशी (२७, रा. पाबळवाडी, ता. पाटण) या संशयितांना अटक केली आहे.