कऱ्हाडात चक्क कोरोनाग्रस्ताचा दुचाकीवरून फेरफटका

कऱ्हाडात विनाकारण फिरणाऱ्या, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांनी भेदा चौकात नाकाबंदी केली होती.
Corona Patient
Corona Patientesakal

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाग्रस्तच (Corona Patient) दुचाकीवरून फिरत होता, असे पोलिसांनी आज केलेल्या नाकाबंदीत समोर आले असून या प्रकाराने यंत्रणा पूर्णपणे हादरली आहे. पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील (Deputy Superintendent Of Police Ranjit Patil) यांनी स्वतः रस्त्यात उभे राहुन भेदा चौकात नाकाबंदी केली होती. त्यांनीच अडवलेला दुचाकीस्वार कोरोनाग्रस्त निघाल्याने धावपळ उडाली. उपाधीक्षक पाटील यांनी एका दुचाकीस्वाराला अडवले. त्या दुचाकीस्वाराने स्वतःचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Report Positive) असल्याची धक्कादायक माहिती दिली. त्याने त्यांचा एचआरसीटीचा अहवालही त्यांना दाखवला. पॉझिटिव्ह रूग्णच बाहेर फिरत असल्याच्या धक्कादायक प्रकाराने सारीच यंत्रणा हादरली आहे. (Corona Patient Bike Rides In Karad City Satara News)

शहरात विनाकारण फिरणाऱ्या, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांनी येथील भेदा चौकात नाकाबंदी केली होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. येणाऱ्या प्रत्येक वाहनाला अडवून विचारले जात होते. त्यामुळे अनेकांची तारांबळी उडाली होती. विनाकारण फिरणाऱ्या 60 जणांवर कारवाई झाली. त्याशिवाय काहींची वाहनेही जप्त झाली आहेत. नाकाबंदी सुरू असतानाच पोलिस उपाधीक्षक रणजती पाटील यांनी एका दुचाकीस्वाराला हटकले. त्याला अडवून विचारपूस केली. त्यावेळी त्या दुचाकीस्वाराने थेट तोच कोरोनाबाधित आहे, असे स्पष्ट सांगितले.

Corona Patient
बाजारपेठेत गर्दी उसळताच पोलिसांनी भाजीपाला भरला टेंपोत; शेतकऱ्यांत नाराजी

त्याने स्वतःचे एचआरसीटीचे रिपोर्टही पोलिसांना दाखवले. कोरोनाग्रस्त दुचाकीवरून येऊ शकतो, याची कल्पनाच नसल्याने अचानक घडलेल्या प्रकाराने पोलिस यंत्रणा हादरली. पोलिस उपाधीक्षक पाटील यांनीही त्या संबंधिताला खडे बोल सुनावले. त्याला लगचे यंत्रणेने बाजूला घेवून सुरक्षितस्थळी हलवले. मात्र, कोरोनाग्रस्ताचा दुचाकीवरील फेरफटका त्या परिसरात चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी पोलिस यंत्रणा देखील हादरली होती. त्यांनी येणाऱ्या प्रत्येकाला मास्कची सक्ती केली. ज्यांनी लावला नाही, त्यांच्याकडून दंडाची आकारणी केली आहे.

मोहफुलाचा दारुसाठीच नाही, तर औषधासाठी देखील वापर होतो; जाणून घ्या 'मोहफुल' काय आहे?

Corona Patient Bike Rides In Karad City Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com